Last Updated on 30 Mar 2024 4:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर । येथील विधीज्ञ धनाजी रंगराव पाटील यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीबदद्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ॲड. पाटील हे गेले 24 वर्शे वकीली व्यवसायात आहेत.त्यांनी सन 2007 ते 2020 अषी सुमारे 13 वर्शे इस्लामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात विधी अधिकारी म्हणून काम पाहीले आहे.
सध्या ते पदम्भुशण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी पुर्नवसीत नागरीक सहकारी पतसंस्था वाळवा, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वाळवा, जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बोरगांव, कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था कराड, लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कामेरी,श्री म्हाळसाकांत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पाल,सोनहिरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कामेरी, युनियन बॅंक ऑफ इंडीया शाखा – इस्लामपूर, शिराळा, आरळा, सागांव, कामेरी, पेठ, वाळवा, सांगली,वृदांवन महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वाळवा, राजारामबापू सहकारी बॅंक लि. पेठ, शाखा – रेठरे हरणाक्ष, कचेरी रोड इस्लामपूर, ब्राम्हणपुरी इस्लामपूर आदी बॅंका, पतसंस्था व विकास सोसायटींच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

त्याचबरोबर ते सांगली जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकील व्यवसाय करत आहेत.या निवडी बदद्ल त्यांचे विविध संस्था, बॅंका, तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदींनी भेटून अभिनंदन केले.










































































