Last Updated on 26 Sep 2021 3:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रशियातील नदीचे रहस्य अनेक वर्षानंतरही वैज्ञानिक उलगडू शकलेले नाहीत. म्हणजेच ही नदी नुसती दगडांची आहे. रशियाच्या टगानी पार्क, दक्षिण उरल पर्वताजवळ ही दगडांची नदी आहे. तिला स्टोन रन असेही नाव आहे.
वैज्ञानिकांच्या मते 10 हजार वर्षापूर्वी ग्लेशियर कोसळून हे महाकाय दगड डोंगर उतरवून खाली आले असावेत. या दगडी नदीच्या किनाऱ्याला पाईन वृक्ष आहेत. नदी पात्रातील काही प्रचंड अणकुचीदार शिळा जमिनीत खोलवर घुसल्या आहेत.
सुमारे 6 किलोमीटर लांबीची ही स्टोन रिवर काही ठिकाणी 20 मीटर रुंद आहे, तर काही ठिकाणी 200 ते 700 मीटर रुंद आहे.या नदीतील काही शिलांचे वजन 10 टनापर्यंत आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर हे दगड कुठून आणि कसे आले याचे रहस्य कायम आहे.










































































