Last Updated on 24 Nov 2021 11:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आजकाल मार्केटमध्ये वेगेवगळ्या प्रकारचे हेडफोन्स आलेले आहेत. लोकही सातत्याने हेडफोन्स वापरत असतात. ऑफिसमध्ये, घरी किंवा गाडीवर असतानाही हेडफोन्स सर्रास वापरले जातात. परंतु आपणाला माहिती आहे का की, हेडफोन्सचा सतत वापर करणे आपल्या आरोग्यासाठी घातक असते. म्हणून हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करावा, असा सल्ला डॉक्टर देत असतात. हेडफोन वापरणे ही सवय आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जाणून घ्या हेडफोनचे दुरुपयोग.
ऐकण्याची क्षमता कमी होते
तुम्ही नेहमी मोठ्या आवाजात हेडफोनने गाणे ऐकत असाल तर कान दुखण्याच्या तक्रारी येऊ शकतात. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि तरीही हेडफोनचा वापर करणे टाळले नाही तर तुम्ही बहिरेही होऊ शकता. यामुळे कान दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे दाखवावे. कारणे हेडफोन ऐकताना कान दुखणे हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. आपल्या कानांची ऐकण्याची एक क्षमता असते. 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकणे कानांसाठी हानिकारक असते. मोबाईलमध्येही आवाज वाढवताना एक नोटीफिकेशन येते की, यापेक्षा आवाज वाढवल्यास कानांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या नोटीफिकेशनकडे दुर्लक्ष करु नका. त्यापेक्षा जास्त आवाज वाढवू नका.
इन्फेक्शनचा धोका
काही जणांना हेडफोनचे व्यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते. सततच्या हेडफोनमुळे त्यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. यामुळे त्यांनाही मोठ्या आवाजाने बोलण्याची सवय लागते. हेडफोन इतरांसोबत शेअर करु नये. यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबवता येते. दुसऱ्याचे हेडफोन घेण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तर ते हेडफोन आधी नीट स्वच्छ करावे मगच कानात घालावे.
आरोग्यावर घातक परिणाम
काही जणांना हेडफोनचे व्यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते. सततच्या हेडफोनमुळे त्यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. यामुळे त्यांनाही मोठ्या आवाजाने बोलण्याची सवय लागते. ज्याचे अनेक तोटे आहेत. अशा लोकांना रात्री नीट झोपही लागत नाही. ज्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात.











































































