Last Updated on 24 May 2020 8:10 AM by
पोलीस उपायुक्तांच्या मुलींनी असा दिला संदेश
गृहमंत्री अनिल देशमुख व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शरयू व शर्वरीचे व्हिडिओ स्वत:च्या फेसबुकवर व्हायरल करीत केले कौतुक
इस्लामपूर : कोरोना संसर्गा विरोधात रात्रन् दिवस लढा देणाय्रा पोलीस , प्रशासन व आरोग्य कर्मचाय्रांचे मनोधर्य वाढविण्यासाठी येथील शरयू व शर्वरी घट्टे या विद्यार्थिनीनी एक व्हिडीओ तयार करुन सोशल मिडियावर टाकला आहे.तो सध्या चांगलाच गाजत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व पालक मंत्री जयंत पाटील यांनीही याची दखल घेवून या विद्यार्थिनींचे कौतुक केले.तसेच हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून घरात राहून शरयू व शर्वरी या इयत्ता ९ वीत शिकणाय्रा जुळ्या बहिणी कोरोना विरोधातील लढा पहात आहेत. यामध्ये पोलीस, प्रशासन व आरोग्य विभागातील कर्मचारी करत असलेल्या कामाने त्या भारावून गेल्या. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी व नागरिकांनी घरातच थांबून त्यांना सहकार्य करावे यासाठी या मुलिंनी कोरोनाविरोधात जनजागृती करणारा व्हिडीओ बनवला.तो व्हिडीओ त्यांनी फेसबुकर टाकला.सर्वप्रथम पुणे पोलीस दलाने या व्हिडीओचे कौतुक केले.त्यानंतर स्वता राज्याचे गृहमंत्री देशमुख व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही याची दखल घेत हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर करत या बहिणेंचे कौतुक केले.हा संदेश खरोखरच प्रेरणादायी असल्याचे या मंत्रांनी म्हटले आहे. ना.जयंत पाटील व ना.अनिल देशमुख यांनी दिलेल्या प्रेरणेसाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत अशी प्रतिक्रिया या विद्यार्थिनी ‘अधोरेखित’ शी बोलताना दिली.














































































