Last Updated on 27 Nov 2023 8:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी बहे (ता. वाळवा) येथील ‘रामलिंग बेटा’वरील राममंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक मंदिर परिसर व नदीघाटांवर दीपोत्सव साजरा केला जातो.सालाबादप्रमाणे रामलिंग बेटावरही बडवे-पुजारी व बहे ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मंदिर परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले.या दिव्यांनी रामलिंग मंदिर परिसर उजळून निघाला.
यावेळी सरपंच संतोष दमामे,कृष्णा कारखान्याचे माजी संचालक संभाजी दमामे,अनिल बडवे,प्रा.मकरंद बडवे,बहेच्या माजी उपसरपंच व रामलिंग बेट देवस्थान समितीच्या अध्यक्ष सौ.विजयमाला पाटील,सचिव अधिक बडवे,माजी उपसरपंच सौ.अर्चना दमामे,उदय बडवे,नारायण कुंभार,संभाजी हुबाले,भगवान दमामे,जयवंत फल्ले,चिमणेचे माजी सरपंच दत्तात्रय खेडेकर,प्रा.मानसिंग खेडेकर,प्रा.सुजाता खेडेकर,सौ.मीनाक्षीदेवी दमामे,सौ.जानकीबाई दमामे,सौ.मधुरा बडवे,सौ.अस्मिता बडवे,सौ.अर्चना बडवे,संकल्पना पाटील,लखन कोकीळ,चैतन्य जोशी,अपूर्व बडवे,अनुज बडवे,अथर्व बडवे,प्रथमेश बडवे,योगेश डुकरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.









































































