Last Updated on 28 Feb 2024 10:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू सहकारी बँकेच्या साखराळे शाखेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्याप्रती कृतज्ञता म्हणून स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान केला आहे. नव्या पिढीने स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानाचा विसर पडू देऊ नये,अशी भावना प्रा.शामराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
साखराळेचे जेष्ठ नेते बाळासाहेब बाबुराव पाटील,माजी सभापती आनंदराव शामराव पाटील,अरविंद भिमराव पाटील,रणधीर शिवराम पाटील,संभाजी तुकाराम पाटील, जयसिंग कृष्णा पाटील,रघुनाथ रामचंद्र पाटील,युवराज रघुनाथ शिंदे,जुनेखेडचे दिलीप शामराव पाटील,श्रीमती शेवंता यशवंत महाडिक,नवेखेडचे अधिक शिवाजी जंगम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,साखराळे शाखेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे.गेल्या वर्षी साखराळे शाखेचा उत्कृष्ठ शाखा म्हणून सन्मान केलेला आहे. साखराळे शाखा व बँकेच्या प्रगतीमध्ये खातेदार,सभासद व हितचिंतकांचे योगदान मोलाचे आहे.आम्ही बँकेच्या वतीने आधुनिक बँकिंग प्रणालीच्या सर्व सोई-सुविधा देत आहोत.तसेच शासकीय व विविध महामंडळाच्या अनुदानित कर्ज योजनांचा आपण लाभ घ्यावा.
संचालक धनाजी पाटील,माणिक पाटील,सुभाषराव सुर्यवंशी,शिवाजी कुंभार, प्रा.डॉ.दीपा देशपांडे,माजी अध्यक्ष शामराव वाटेगावकर,माजी संचालक रामराव माळी, काकासाहेब यादव,तसेच सुहास पाटील,सर्जेराव देशमुख,बाबुराव पाटील,प्रदीप चव्हाण,राजेंद्र पाटील,कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत पाटील,सुजय पाटील, प्रेमनाथ कमलाकर,संतोष खटावकर,संजय सत्रे,सुभाष भोसले,श्रीमती मुनीरा लांडगे, जनरल मॅनेंजर श्रेणीक मगदूम,एच.के. पाटील,सुभाषराव पाटील यांच्यासह साखराळे व परिसरातील गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी शाखाधिकारी प्रदीप मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांनी आभार मानले.









































































