Last Updated on 12 Aug 2020 2:21 AM by

पुणे : इस्लामपूर येथील नायब तहसीलदार भगवान यशवंत पाटील यांना कोविड-१९ या संसर्गजन्य महामारी काळात तालुक्यात आपला जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सिद्धी फाऊंडेशन पुणे यांचे वतीने कोविड योद्धा म्हणून फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर खिरीड कार्याध्यक्ष सतीश शितोळे यांच्या हस्ते व मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितित गौरवान्वित करण्यात आले.भगवान पाटील हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये निवासी नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत.
भगवान पाटील यांनी यापूर्वी मुळशी तालुक्यातील सातबारा संगणकीकरण काम पुणे जिल्ह्यात सर्व प्रथम पूर्ण केले होते.त्यामुळे त्यांना तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते व नवल किशोर राम जिल्हाधिकारी पुणे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे,उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे या प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत गौरव करण्यात आला.














































































