Last Updated on 30 Oct 2022 12:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
किल्ले पहाण्यास खुले : शिवप्रेमींची उत्स्फूर्त गर्दी
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक,विद्यार्थी व सोशल मिडियाने इस्लामपूर येथील प्रशासकीय भवनसमोर आयोजित केलेल्या भव्य जयंत गडकोट किल्ला स्पर्धेने इस्लामपूर नगरीत साक्षात शिवसृष्टी साकारली असून हे किल्ले पहाण्यास खुले करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक,विद्यार्थी व सोशल मिडियाने इस्लामपूर नगरीत साक्षात शिवसृष्टी साकारली असून हे किल्ले पहाण्यास खुले करण्यात आले आहेत.दरम्यान,हे प्रदर्शन पहाण्यास इस्लामपूर,आष्टा या शहरांच्यासह वाळवा तालुक्यातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्त गर्दी केली आहे. हे प्रदर्शन पाच दिवस खुले रहाणार आहे.
रायगड,सिंहगड,प्रतापगड,पन्हाळा,जंजिरा आदी किल्ले पहाण्यास मोठी गर्दी।।
साई प्लाझा (इस्लामपूर) यांनी रायगड,प्रज्वल धनंजय बिचकर यांनी पद्मदुर्ग,शिवशाही किल्ले मंडळ (शिवनगर) यांनी विजय दुर्ग,पल्सर ग्रुप (येलूर) यांनी सिंहगड,आश्लेषा हेमंत कोळी यांनी रायगड,अरमान मुल्ला यांनी जंजीरा,वैभव बोंगाणे यांनी प्रतापगड,प्रतीक जाधव यांनी रायगड,आशुतोष जाधव यांनी तोरणा,विभाग जाधव यांनी पन्हाळा,माणिक पाटील यांनी जंजीरा,सागर पाटील यांनी सिंदुदुर्ग आदी हुबेहूब किल्ले बनविले आहेत. त्यांना संयोजकांनी जागा व साहित्य पुरविले आहे.![]()
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचा किल्ला बनविणाऱ्या युवकांशी संवाद
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे जयंत गडकोट किल्ला स्पर्धे तील किल्ला प्रदर्शनास भेट देत प्रत्येक किल्ला पाहिला, व किल्ला बनविणाऱ्या युवकांशी संवाद करीत माहिती घेतली आणि त्यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी त्यांनी ‘पद्मदुर्ग’हा दुर्मिळ किल्ला बनविलेल्या पाचवी -सहावीत शिकणाऱ्या प्रज्वल व प्रणव बिचकर बंधूंना रोख ११ हजाराचे बक्षिस देवून सन्मानित केले.इस्लामपूर येथील प्रशासकीय भवनसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक,विद्यार्थी व सोशल मिडिया सेलच्या वतीने भव्य जयंत गडकोट किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धे तील किल्ल्यांचे प्रदर्शन शिवप्रेमी व नागरिकां ना पहाण्यास खुले केलेले आहे. आ.पाटील यांनी शुक्रवारी उशिरा इस्लामपूर येथील किल्ला प्रदर्शनास भेट दिली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,किल्ले अभ्यासक सचिन पाटील,महिला राष्ट्रवादी च्या शहराध्यक्षा रोझा किणीकर,माजी नगरसेवक पिरअली पुणेकर,सुनील मलगुंडे होते.आ.पाटील म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता असून रयतेचे राज्य निर्माण करण्यात गडकोट-किल्ल्यांचे मोलाचे योगदान आहे. हा किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणायला हवा. हे किल्ले पाहताना शिवकाळात गेल्याचा अनुभव आला. ज्यांनी-ज्यांनी किल्ले हे पाहिलेले नाहीत,त्यांना हे किल्ले पाहण्याची संधी प्रतिकदादा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देवू.
चिमुकल्यांच्या घरी जाऊन शाब्बासकी
इस्लामपूर येथे पाचवी-सहावीत शिकणाऱ्या प्रज्वल बिचकर व प्रणव बिचकर या मुलांनी ‘पद्मदुर्ग’हा किल्ला हुबेहूब बनवून किल्ल्याची माहिती अतिशय सफाईदारपणे दिली. आ.पाटील यांनी त्यांचे कौतुक करताना त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित केले. तसेच उदय चौकातील ८-१० शालेय शिक्षण घेणाऱ्या मुले-मुलींनी भव्य किल्ला बनवून अचूक माहिती दिली. या मुलांनी घरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त केली असता,’हो नक्की येईन व तुमच्या आई-वडिलांना तुम्ही सुंदर किल्ला केल्याचे सांगू,’अशी ग्वाही आ.पाटील यांनी दिली.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,किल्ले अभ्यासक सचिन पाटील (कुरळप), प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन खुले करण्यात आले. हे प्रदर्शन पहाण्यास इस्लामपूर,आष्टा या शहरांच्यासह वाळवा तालुक्यातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्त गर्दी केली आहे. हे प्रदर्शन पाच दिवस खुले रहाणार आहे.अण्णासाहेब डांगे म्हणाले,माजी मंत्री जयंतराव पाटील,प्रतिक पाटील यांच्या संकल्पनेतून आपण उत्तम स्पर्धा घेतली आहे. घरोघरी जाऊन किल्ले पहाणे शक्य होत नाही. मात्र आपण एकाच ठिकाणी किल्ले पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
किल्ले अभ्यासक सचिन पाटील यांनी राज्यातील किल्ल्यांचा इतिहास सांगून राज्यातील किल्ले व त्यांचा इतिहास,माहिती नव्या पिढीसमोर आणायला हवी,अशी भावना व्यक्त केली. सुशांत कुराडे, प्रणव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वनाथ डांगे,रोझा किणीकर प्रतिभा पाटील,सचिन कोळी,स्वरूप मोरे,बाळासाहेब कोळेकर,गोपाळ नागे यांच्यासह युवक, विद्यार्थी व सोशल मिडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
प्रारंभी संयोजन समितीचे अध्यक्ष अभिजित रासकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज पाटील यांनी आभार मानले. युवक राष्ट्रवादीचे तन्वीर चाऊस,उदय कांबळे, दादासो सुर्यवंशी,विद्यार्थी संघटनेचे रोहन देसाई, प्रतिक नायकल,सोशल मिडियाचे सूरज कचरे,प्रज्वल पाटील,बंटी उरूणकर, आयुष जाधव,चांद मुल्ला,आशिष मलगुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे व प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे.














































































