Last Updated on 10 Jun 2023 8:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’,अशी धमकी देणाऱ्या व्यक्तींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,शहदराध्यक्षा रोझा किणीकर,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,प्रदेश सरचिटणीस छाया पाटील, प्रदेश सदस्या कमल पाटील यांनी इस्लामपूर येथे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना निवेदन दिले.
खा.शरदचंद्र पवार हे देशातील जेष्ठ आणि जाणते नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य उभा करताना देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान केलेले आहे. त्यांना समाज माध्यमा तून ‘तुमचा दाभोलकर करू’,अशी धमकी देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस खात्याने हा विषय गंभीरपणे घेऊन दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. एका बाजुला दिवसा ढवळ्या खून,चोऱ्या,मारामाऱ्या,तसेच महिलांचे विनयभंग होत असताना राज्य शासन उदासीन आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट आहे का?असा सवाल निवेदनात केला आहे.
यावेळी संचालिका मेघा पाटील,जिल्हा सदस्या शैलजा जाधव,पुष्पलता खरात,सुनंदा साठे,सायली गोंदील,प्रतिभा पाटील,हेमलता चव्हाण,नीता पाटील,युवती शहराध्यक्षा कु.प्रियांका साळुंखे,आष्टा शहराध्यक्षा शिवानी कदम,कु.कोमल भोसले,कु.मयुरी कल्याणी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.











































































