Last Updated on 06 Jun 2023 7:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
डॉ. शिवकांत पाटील आणि डॉ. अमृता पाटील यांचा गौरव
सांगली । सांगली जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक,औद्योगिक,राजकीय व वैद्यकीय वारसा आहे.जिल्ह्यातील विविध क्षेत्रात असणाऱ्या उत्तुंगतेचा अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातून आपणास घेता येईल,असे प्रतिपादन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले.
रेडिओ ऑरेंज आयोजित ‘सांगली जिल्ह्याचे शिलेदार’ पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी सांगलीतील विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्सचे डॉ. शिवकांत पाटील व डॉ. अमृता पाटील यांना महापौरांच्या हस्ते गौरविण्यात आले.डॉ.पाटील यांच्या विशेष संशोधित आयुर्वेद उपचार पद्धतीने पोटविकार व सांधेविकारांच्या आयुर्वेद चिकित्सेतील विशेष प्राविण्याने आजवर अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे.
यावेळी बी. डी. पवार, पराग चौधरी,यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.संयोजन सुरज पाटील यांनी केले.सूत्रसंचालन विशाल कुलकर्णी यांनी केले.











































































