Last Updated on 22 Apr 2025 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देणार : ना.अजित पवार
मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासात सांगली जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे, मात्र अलीकडील काळात सांगली जिल्ह्याला योग्य नेतृत्व न मिळाल्याने हा जिल्हा विकासापासुन वंचीत राहीला, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा विचार महाराष्ट्रातील जनता स्विकारताना दिसत आहे, सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देत रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याची घोषणा ना.अजित पवार यांनी केली.
सांगली जिल्ह्यातील माजी आमदार ,माजी मंत्री व विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज मुंबई येथे ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे हे होते. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे.स्व.यशवंतराव चव्हाण व स्व.वसंतदादा पाटील यांचा जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा आहे.सांगली जिल्ह्यात विकासाला निधी कमी पडू देणार नाही.पक्षबांधणीवर भर द्या, हा अजित पवार तुम्हाला कधी ही अंतर देणार नाही. लोकांची कामे करा, कुठे अडचण असेल तर आवाज द्या आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहु. आज पक्षात सर्वांचे स्वागत करतो. नवा जुना असा भेदभाव मी कधीच करीत नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते राष्ट्रवादी पक्षात, हा पक्ष नसून एक कुटुंब आहे. एकसंघ काम करुन राज्याला एका उंचीवर घेऊन जाऊ असे शेवटी ना.अजित पवार यांनी मत व्यक्त केले.
खा.सुनिल तटकरे म्हणाले, आपला पक्षाची विचारधारा ही महाराष्ट्राच्या मातीशी व विचाराशी जोडलेली आहे,कोणता ही भेदभाव आड आणु दिला जात नाही,सांगली जिल्ह्याची महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख आहे,तीच ओळख ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागा,रखडलेला विकास साधण्यासाठी आम्ही कटीबध्द आहे.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्थाविक करताना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नेते निशिकांत भोसले- पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील दहशतीच्या राजकारणाला काही वर्षापुर्वीच पुर्णविराम मिळाला आहे,जाणीवपुर्वक विकास रखडलेला आहे.सहकार तत्वावरील संस्था अडचणीत आहेत,बेरोजगारी मोठी आहे हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपली ताकत अजितदादांच्या पाठीशी उभा करु,सांगली जिल्ह्यातील सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत करतो असे शेवटी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम शिवाजीराव नाईक, माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सांगली चे माजी अध्यक्ष विलासराव जगताप साहेब, खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्र (आण्णा) देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सांगली चे माजी उपाध्यक्ष रणधीर शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौंडा ईश्वरप्पा रविपाटील, आटपाडी येथील भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीण चे माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील,संग्राम जगताप, पलूस येथील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते व संग्राम उद्योग समुहाचे चेअरमन निलेश बापुसो येसुगडे,सांगली काँग्रेस शहर अध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्या सह जिल्ह्यातील शिराळा, जत,खानापूर आटपाडी, पलूस कडेगांव, इस्लामपूर ,सांगली शहर या विधानसभा मतदार संघातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

आ.शिवाजीराव गर्जे, आ.इद्रीस नायकवडी, सांगली जिल्हाध्यक्ष प्रतापराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, निवास पाटील ,धैर्यशील मोरे, मधुकर हुबाले, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, भास्कर कदम, प्रविण माने, चंद्रकांत पाटील, रणजीत माने, अजित पाटील,अक्षय पाटील, उमेश जाधव, मोहन जाधव, अक्षय कोळेकर, विश्वजीत पाटीलआदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.











































































