Last Updated on 14 Aug 2022 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्न धान्याचा लाभ मिळाविण्याकरीता पात्र असणा-या सर्व लाभार्थीना,जर त्यांना सवलतीच्या दराने अन्न धान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दराने अन्न धान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘अनुदानातून बाहेर पडा’ ही योजना कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याना सवलतीच्या दराने मिळणा-या अन्नधान्याचा लाभ घ्यावयाचा नसल्यास व देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावयाचा असल्यास अशा लाभार्थ्यांनी (सरकारी/निमसरकारी नोकरी, पेन्शनधारक, व्यावसायिक, बागायतदार,शेती या उत्पन्नाच्या स्त्रोताव्दारे ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण करीता ४४ हजार व शहरी ५९ हजारापेक्षा जास्त तसेच चारचाकी वाहनधारक,आयकर भरणारे लाभार्थी,ज्या कुटूंबातील व्यक्ती परदेशात आहे असे लाभार्थी तसेच स्वेच्छेने धान्य सोडणार असतील अशा लाभार्थ्यांनी) सोबत जोडलेला विहीत नमुण्यातील फॉर्म भरुन संबंधित तलाठी/ ग्रामसेवक यांचेकडे सुपूर्द करावेत,असे आवाहन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.
वाळवा तालुक्यात दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या ग्रामसभेत सदर सुचना सर्व लाभार्थ्यांना वाचून दाखवाव्यात,गावी जास्त जास्त याची प्रसिध्दी द्यावी व लाभार्थी कडून फॉर्म भरुन घ्यावेत.सदरचे फॉर्म दिनांक १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत जमा करून घेवून तलाठी व ग्रामसेवक यांचे संयुक्त स्वाक्षरीने फॉर्मसह अहवाल तहसिल कार्यालयास सादर करावा,असे तहसीलदार उबाळे यांनी सांगितले.
‘अनुदानातून बाहेर पडा’ ही योजना यासाठी :
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,१०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्न धान्य देण्याकरीता शासनावर येणारा अर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीकोणातून तसेच योग्य व गरजू लाभार्थींना सवलतीच्या दराने अन्न धान्याचा लाभ मिळावा या उद्दीष्टासाठी ‘अनुदानातून बाहेर पडा’ ही योजना
बहे येथील सधन लाभार्थ्यांना आवाहन
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याना सवलतीच्या दराने मिळणा-या अन्नधान्याचा लाभ घ्यावयाचा नसल्यास व देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावयाचा असल्यास अशा बहे (ता.वाळवा) येथील लाभार्थ्यांनी सोबत जोडलेला विहीत नमुण्यातील फॉर्म भरुन सुपूर्द करावेत,असे आवाहन मंडळ अधिकारी तानाजी यादव व गावकामगार तलाठी अविनाश पाटील यांनी केले आहे.
‘अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा’ फॉर्म









































































