Last Updated on 25 Apr 2023 5:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मऱ्हाटमोळा मराठा समाज भूषण पुरस्काराने सन्मान
सांगली । शेतकऱ्यांनी निसर्गाचे संकेत ओळखायला शिकले पाहिजे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी हवामानाचे अंदाज सांगत असतात.त्यासाठी आपले निरीक्षण चांगले हवे.एल निनोचा परिणाम भारतीय पर्जन्यावर होणार नाही.हवामानाचा जवळपास तीस वर्षाचा अनुभव व अभ्यास असल्यामुळे अचूक अंदाज येतो.शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निस्वार्थपणे प्रबोधनाचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन पंजाबराव डख यांनी केले.
हवामान अभ्यासातील त्यांचे अचूक मार्गदर्शन व संशोधनासाठी मऱ्हाटमोळा युवक मंडळामार्फत मराठा समाजभूषण पुरस्काराने पंजाबराव डख यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील हे अध्यक्षस्थानी होते.भारती बँकेचे संचालक जितेश कदम,वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील,संस्थापक सुरेंद्र पाटील,अध्यक्ष राकेश पाटील,प्रा. अनिल पाटील,कार्यवाहक अभिजित पाटील,बाळासाहेब पाटील,केदार पाटील,सागावच्या लोकनियुक्त सरपंच अस्मिता रवी पाटील,सुरूलचे सरपंच शंकर चव्हाण, नायकलवाडीचे सरपंच उपस्थित होते.
पी. आर पाटील म्हणाले,शेतीसाठी हवामान,पाऊस व सिंचनाची व्यवस्था गरजेची आहे.भारतातील महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणे असूनसुद्धा खूप कमी सिंचन व्यवस्था आहेत.पण मागील काही काळात सिंचनाचे काम भरपूर प्रमाणात झाल्याने शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला आहे.राज्यात पश्चिम महाराष्ट्र सिंचनाच्या बाबतीत सुदैवी आहे.जागतिक तापमानवाढ हा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर आहेत.तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
पाटील पुढे म्हणाले,मऱ्हाटमोळा मंडळाचा समाजातील कर्तृत्ववान इस्लामपूर हवामान संशोधक पंजाबराव डख यांना सन्मानित करताना लोकांना समाजासमोर आणून सन्मान पी. आर. पाटील समवेत धैर्यशील पाटील, सुरेंद्र पाटील, राकेश पाटील व अन्य करणे हा उपक्रम स्तुत्य आहे.
कार्यक्रमाचे संयोजन हेमत पाटील,सुनिल कचरे संदिप पाटील,दिग्विजय पाटील,विश्वजित पाटील,अधिक पाटील,रोहन देसाई,रोहित पाटील,श्रीनाथ जाधव,अनिल नांगरे,सचिन पाटील,ओंकार हुबाले,प्रथमेश साठे,गणेश पाटील,विनायक पाटील यांनी केले.सुत्रसंचलन प्रातृप्ती थोरात यांनी केले.स्वागत प्रा.विजय गायकवाड व प्रास्ताविक महेश कळसकर यांनी केले.












































































