Last Updated on 23 Nov 2021 11:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर ।
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठीच्या समितीची अॅड.धैर्यशिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीसाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ अवनीश पाटील,भारतीय पुरातत्व विभागाचे जतन सहाय्यक,महाराष्ट्र शासनाचे वस्तुसंग्रहालय प्रमुख उदय सुर्वे,कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध शिल्पकार महेश डोंगरसाने,सुप्रसिद्ध चित्रकार धीरज जे सुतार, अभियांत्रिकीचे माजी उपकुलसचिव गिरीश कुलकर्णी,अभियांत्रिकीचे उपकुलसचिव रणजीत यादव, तंत्रशिक्षण विभागाचे प्रो अजित कोळेकर उपस्थित होते.
यावेळी अॅड.धैर्यशिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची तज्ञांसमवेत पाहणी केली.














































































