Last Updated on 02 Nov 2021 6:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे.तसेच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचे दिसत आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे.
काही दिवसांपूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता









































































