Last Updated on 22 Oct 2021 11:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्व सामान्य माणसांना विमानात बसण्या विषयी फार मोठे कुतुहल असते. त्यातल्या त्यात अनेकांना तर आपण आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा असे देखील वाटत असते. तसेच विमानात पहिल्यांदा बसताना अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, म्हणजे विमान सुरु होताना पंख्याच्या येणाऱ्या आवाजामुळे, किंवा उंचावर उडते अशी भिती अनेकांच्या मनात असते. मात्र जर विमान प्रवासा दरम्यान, एखाद्याचा मृत्यू झाला तर काय केले जाते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.
काय केले जाते
विमान प्रवासा दरम्यान, मृत्यू अशा घटना या खुप कमी म्हणजे अगदी लाखांमध्ये एखादीच अशी घटना घडते. दरम्यान, बऱ्याच वेळा अचानक किंवा एखादी घटना घडते आणि मग मृत्यू होतो. या अशा सिच्युवेशनला मेडिकल एमर्जन्सी असे म्हंटले जाते. अशा प्रसंगी विमानाचे कर्मचारी परिस्थिती कशी हाताळतात हे कुतुहूल सगळ्यांनाच असते. बऱ्याचदा लांबच्या विमान प्रवासा दरम्यान, अनेकांना अस्वस्थ वाटते, विमानप्रवासाच्या मानसिक भितीमुळे अशी तक्रार उतारु करतात. विमानातील केबिन क्रूला अशा तक्रारी हाताळण्याची सवय असते. थोडा मानसिक धीर देला की परिस्थिती पूर्ववत होते. मात्र जर अगदी एमर्जनसी सिच्युवेशन असेल तर एक्शन घेतली जाते.
मदतीसाठी अनाऊन्समेंट
मेडिकल एमर्जन्सीच्या या सिच्युवेशन मध्ये विमानात अनाउन्समेंट करुन प्रवासात कोणी नर्स, डॉक्टर आहे का अशी विचारणा केली जाते. अशी मदत बर्याचवेळा उतारुचा जीव वाचवू शकते.
संपर्क करुन मदत
नेमका फ्लाइटमध्ये डॉक्टर नसेल तर? अनेक परदेशी कंपन्या मेड एअर नावाच्या कंपनीची मदत घेतात. ही कंपनी दिवसरात्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस देते. वैमानिक त्यांना संपर्क करून मदत घेऊ शकतो.
मृत्यू झाला तर
दरम्यान, कोणतीही पुर्व सुचना मिळाली नाही आणि मृत्यू झाला तर अशा वेळी एमर्जन्सी लॅंडिग केले जात नाही. मृतदेह शेवटच्या सिट रिकाम्या असतील तर त्या ठिकाणी ब्लॅंकेटस टाकुन ठेवला जातो.सिटस रिकाम्या नसतील तर आहे त्याच जागी सिट बेल्ट लाऊन, ब्लॅंकेट टाकुन मृतदेह झाकला जातो.
अनेक विमानांमध्ये बॉडि बॅग्स उपलब्ध असतात, अशा वेळी त्यांचा वापर केला जातो. मात्र अशा कोणत्याही परिस्थीत विमानातील सहप्रवासी घाबरुनये त्यासाठी क्रुमेंबर्सचे मनोधैर्य कामी येते. ते अशा सिच्युवेशन्स खुप शांतपणे हाताळतात. बऱ्याचदा एखाद्या मोठ्या नेत्याचा किंवा सैनिकाचा मृतदेह विमानाने आणला जातो. अशा वेळी त्याचा उल्लेख जीम विल्सन असा केला जातो. बर्याच वेळा अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा उल्लेख पण असा केला जातो. मृत व्यक्तीला जीम विल्सन म्हणण्याचे कारण असे आहे की शव वाहतुकीसाठी वापरली जाणारी पेटी बनवणार्या कंपनीचे नाव जीम विल्सन आहे.










































































