Last Updated on 26 Apr 2023 8:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी करून आपले होणारे नुकसान टाळावे आणि आपले भविष्य घडवण्यासाठी जात पडताळणीचा उपयोग करून घ्यावा असे प्रतिपादन अप्पर जिल्ह्याधिकारी तथा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे यांनी केले
कासेगाव येथील येथील आझाद विद्यालयात समता पर्व अंतर्गत जात पडताळणी कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी सांगली जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा आणि अप्पर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे बोलत होत्या.त्यांनी जात पडताळणीचे महत्त्व विशद केले.
त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्वोत्तम करिअरसाठी अभ्यास करा, मेहनत करा असे प्रतिपादन केले,भावी काळामध्ये अधिकारी बनण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार आहे असे त्या म्हणाल्या.यावेळी समतादूत प्रकल्पाचे जिल्ह्याचे प्रकल्पाधिकारी गणेश सवाखंडे यांनी जात पडताळणी येथील बारकावे सविस्तर समजावून सांगितले.जातीचे दाखले कसे काढावेत कोणकोणते फॉर्म लागतात कसे करावे लागणारे पुरावे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करणे केले.प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक समताधिक अंकुश चव्हाण यांनी केले.यावेळी त्यांनी जात पडताळांचे महत्त्व थोडक्यात विशद केले.महासंचालक सुभाष वारे यांचे मार्गदर्शन लाभले,पर्यवेक्षक जे के पवार,एस डी घेरडे, समतादूत विक्रांत शिंदे,सागर आढाव यांनी संयोजन केले.सूत्रसंचालन नितीन जाधव यांनी केले.तर आभार अरुण घोडके यांनी मांडले.






































































