Last Updated on 15 Jul 2025 5:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूक द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी फेरआरक्षण सोडत आज काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढून ग्राम पंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी २३ एप्रिल २०२५ रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार आरक्षण निश्चित झाले नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेरआरक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
९४ ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात सकाळी ११ वाजता पार पडली. गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्त्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे मानोरा तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणाचे लक्ष लागले होते. सदरच्या सरपंच आरक्षणाचा कालावधी दिनांक १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० असा राहणार आहे.
सदर आरक्षण सोडतीसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन हे उपस्थित होते तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार आष्टा राज शेखर लिंबारे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रियांका कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार दगडू उगले, मंडळ अधिकारी विनायक यादव, सहाय्यक महसूल अधिकारी श्री कोळेकर,महसूल सहाय्यक सुनील साळुंखे तसेच मंडळाधिकारी तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
आजच्या सरपंच पदाच्या फेरआरक्षण सोडतीनंतर अनेकांचा भ्रमनिरास झाला तर अनेकांना याची लॉटरी लागली. अपेक्षेप्रमाणे सरपंचपद आरक्षित झाले त्या गावातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..मात्र अपेक्षेप्रमाणे सरपंचपद आरक्षित न झाल्याने काही गावातील कार्यकर्त्यांमध्ये भ्रमनिरास झाल्याचे चित्र आज दिसून आले.

गावनिहाय पडलेले आरक्षण असे : (महिला ५० टक्के आरक्षण)
अनुसूचित जाती – ११ (६)
अनुसूचित जमाती – १ (०)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – २६ (१३)
खुल्या जागेसाठी – ५६ (२८)
फेरआरक्षण असे :
अनुसूचित जाती :
काळमवाडी, जुनेखेड, गोंडवाडी, मर्दवाडी, लवंडमाची
अनुसूचित जाती- महिला :
कारंदवाडी, पडवळवाडी, विठ्ठलवाडी, ढगेवाडी, साटपेवाडी, वाघवाडी
अनुसूचित जमाती :
कापूसखेड.
नागरिकांचा मागास प्रवर्ग :
काकाचीवाडी, बेरडमाची, फाळकेवाडी, बागणी, मिरजवाडी, लाडेगांव, शेणे, केदारवाडी, तांदुळवाडी, कणेगांव, मालेवाडी, घबकवाडी, भरतवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला :
भडकंबे, शिरटे, चिकुर्डे, नेर्ले, पोखर्णी, ठाणापुडे, इटकरे, फार्णेवाडी (शि.), शिरगांव, ओझर्डे, कार्वे, रेठरेधरण, देवर्डे
सर्वसाधारण :
बिचूद, कासेगांव, येडेनिपाणी, वाटेगांव, बनेवाडी, भाटवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, शिवपूरी, ताकारी, नरसिंहपूर, रेठरेहरणाक्ष, नवेखेड, गोटखिंडी, हुबालवाडी, कुंडलवाडी, मसूचीवाडी, येवलेवाडी, शेखरवाडी, साखराळे, बावची, किल्ले मच्छींद्रगड, शिगांव, नागांव, कोरेगांव
सर्वसाधारण – महिला :
बहे, सुरुल, तुजारपूर, वशी, करंजवडे, बहादुरवाडी, माणिकवाडी, मरळनाथपूर, धोत्रेवाडी, नायकलवाडी, कोळे, कुरळप, ऐतवडे बु., ऐतवडे खु., पेठ, बोरगांव, तांबवे, ढवळी, वाळवा, फार्णेवाडी बो., जांभुळवाडी, महादेववाडी, दुधारी, अहिरवाडी, येलूर, रोझावाडी, जक्राईवाडी, कामेरी













































































