Last Updated on 25 May 2025 7:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी जलसंपदा मंत्री आ.जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सांगली । तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित सांगली जिल्ह्यातील ३५० वारणा धरणग्रस्त खातेदारांना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रत्येकी रुपये १ लाख ८५ हजार निर्वाह भत्ता निधी मंजूर झाला आहे. माजी जलसंपदा मंत्री आ.जयंत पाटील यांनी खऱ्या अर्थाने या प्रश्नास गती देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वतीने आ.जयंतराव पाटील यांचा सत्कार करून धरणग्रस्तांनी आपला आनंदोत्सव साजरा केला.
धरणग्रस्तांचे कार्यकर्ते राम सावंत (तुंग) म्हणाले, ज्यांच्या जमिनी वारणा धरणात गेल्या आहेत, त्या धरणग्रस्त खातेदारांना महिन्याला रुपये ४०० प्रमाणे निर्वाह भत्ता मिळायला हवा होता. मात्र १९ वसाहतीमधील ३५० खातेदार तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित होते. आम्ही त्यासाठी सातत्याने मागणी आणि संघर्ष करीत होतो. माजी जल संपदा मंत्री आ.जयंत पाटील यांनी या प्रश्नास गती देऊन पाठपुरावा केल्याने हा निर्वाह भत्ता मंजूर झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यतील ३५० खातेदारांना सध्या निर्वाह भत्त्याचे वाटप सुरू आहे. आमचा जिव्हाळ्याचा एक प्रश्न मार्गी लागल्याने आज आम्ही आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी दिलीप पाटील तुंग, मारुती रेवले आष्टा (पेटलोंड),किरण पाटील, मुब्बारक कावनकर, महादेव पाटील, शंकर लोखंडे कसबे डिग्रज, लक्ष्मण सावंत आष्टा (लोटीव), प्रकाश सावंत, तानाजी पाटील बोरगाव, रामचंद्र सोनावणे बोरगाव, भाऊ जाधव साखराळे, लक्ष्मण पाटील निनाईनगर, शंकर सावंत कवठेपिरान, बिरु येडगे आष्टा, किसन मलप बागणी, प्रकाश सावंत दूधगांव, धोंडीबा सावंत कवठेपिरान, बाबुराव मोरे कवठे पिरान, मिथुन पवार चिकूर्डे,लक्ष्मण घोलप पेटलोंड यांच्यासह शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते.









































































