Last Updated on 28 Jun 2025 3:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पाली मराठी साहित्य संमेलनात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भावळकर यांचे हस्ते युनुस शेख यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती’ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे, जेष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, साहित्यिका ललिता सबनीस, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके आदी उपस्थित होते.









































































