Last Updated on 31 Oct 2021 7:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
काबूल |
तालिबान्यांनी कितीही आश्वासने दिली तरी नागरिकांना त्रास देणे त्यांनी काही सोडलेले नाही. तालिबानचा क्रूरपणा आता पुन्हा एकदा समोर आला आहे. नांगरहार प्रांतात एका लग्नाच्या कार्यक्रमात गाणी लावल्याने तालिबान्यांनी १३ जणांची हत्या केली आहे.
माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी शनिवारी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. तालिबानने टीव्हीवर संगीत आणि महिलांचे आवाज ऐकण्यावरही बंदी घातली आहे. सालेह म्हणाले की, तालिबानने या १३ निरपराध लोकांना केवळ लग्नाच्या कार्यक्रमात गाणी वाजवल्यामुळे मारले. त्यांना ही गाणी बंद करायची होती.













































































