Last Updated on 02 Dec 2021 8:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला,रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी 3 डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर 7 तारखेला येत आहेत. या भेटीची पूर्वतयारी गडावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत.
राष्ट्रपतींच्या यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने रायगड किल्ला ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२१ या पाच दिवसांच्या कालावधीत करता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे .रायगड किल्ल्या बरोबरच रायगडावर जाण्यासाठी सुविधा पुरवणारा रोपवे देखील पर्यटकांसाठी या कालावधीत बंद राहणार आहे. रायगड किल्ल्या बरोबरच रायगडच्या आजूबाजूचा परिसरात देखील पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे .रायगड किल्ल्या वरती जाण्यासाठी महाड नाते खिंड ते पाचाड तसेच माणगाव इथून जाणारा माणगाव ,घेरोशी वाडी मार्गे पाचाड हे दोन रस्ते पर्यटक वापरत असतात. राष्ट्रपतीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोन रस्त्यांवरील वाहतूक देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आगाऊ सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मोदींनीही दिलेली भेट
यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर झाला. याच कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते.











































































