Last Updated on 24 Dec 2021 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
राज्यात आतापर्यंत ३८८.७१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.तर ३६९.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा ९.७१ टक्के आहे.तर राज्यात आतापर्यंत कोल्हापूर विभाग आघाडीवर असून आतापर्यंत ९६.०३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.राज्यातील साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ७ लाख ६० हजार २५० मेट्रिक टन इतकी आहे.
राज्यात २१ डिसेंबरच्या ऊस गाळप अहवालानुसार २०२१-२२ हंगामामध्ये १८६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.यामध्ये ९४ सहकारी तर ९२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.राज्याचा साखर उतारा ९.७१ टक्के इतका आहे.तर कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक १०.८२ टक्के इतका आहे.राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे.कोल्हापूर विभागात ९६.०३ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०३.८६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.तर सर्वात कमी साखर उत्पादन नागपूर विभागात झाले असून १.१८ लाख टन गाळप झाले आहे.
पुणे विभागाचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका आहे.या विभागात ८०.८३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७८.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.सोलापूर विभागाचा साखर उतारा ८.६० टक्के इतका आहे.या विभागात ९३.६१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ८०.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.अहमदनगर विभागाचा साखर उतारा ८.९८ टक्के इतका आहे.या विभागात ५१.१० लाख टन उसाचे गाळप झाले असून ४५.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
औरंगाबाद विभागाचा साखर उतारा ८.८२ टक्के इतका आहे.या विभागात २८.०३ लाख टन उसाचे गाळप झाले असून २४.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.नांदेड विभागाचा साखर उतारा ९.२८ टक्के इतका आहे.या विभागात ३५.०७ लाख टन उसाचे गाळप झाले असून ३२.५५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.अमरावती विभागाचा साखर उतारा ८.३२ टक्के इतका आहे.या विभागात २.८६ लाख टन उसाचे गाळप झाले असून २.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.नागपूर विभागाचा साखर उतारा ७.८८ टक्के इतका आहे.या विभागात १.१८ लाख टन उसाचे गाळप झाले असून ०.९३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
विभागनिहाय सुरु झालेल्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या अशी :(कंसात खासगी)
कोल्हापूर-२५(१०),पुणे-१६(१३),सोलापूर-१६(२७),अहमदनगर-१७(९),औरंगाबाद-११(११),नांदेड-९(१७),अमरावती-०(२),नागपूर-०(३)














































































