Last Updated on 01 Dec 2021 8:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगलीत ८,कोल्हापूरमध्ये ९ तर सातारा जिल्ह्यात १० जागा वाढणार
सांगली ।
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढणार आहेत.नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागा होत्या त्या आता ८५ होणार आहेत.येथे तब्बल १२ जागा वाढणार आहेत.त्यानंतर नाशिकमध्ये ७३ जागा होत्या त्या आता ८४ होणार आहेत.सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागा होत्या त्या आता ६८ होणार आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागा होत्या त्या आता ७४ होणार आहेत.तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६७ जागा होत्या त्या आता ७६ होणार आहेत.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जागा जितक्या वाढतील तेथे त्याच्या दुप्पट पंचायत समिती सदस्य असतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.त्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
तर राज्यात सर्वात लहान जिल्हा परिषद सिंधुदुर्ग असणार आहे. येथील सदस्य संख्या ५५ असणार आहे. याच्या दुप्पट पंचायत समिती सदस्य असतील.
प्रत्येक जिल्हा परिषदेत जागा ‘इतक्या’ वाढणार
अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागा होत्या त्या आता ८५ होणार आहेत.
सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागा होत्या त्या आता ६८ होणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागा होत्या त्या आता ७४ होणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६७ जागा होत्या त्या आता ७६ होणार आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ जागा होत्या त्या आता ५९ होणार आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागा होत्या त्या आता ६४ होणार आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागा होत्या त्या आता ६६ होणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५५ जागा होत्या त्या आता ६२ होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागा होत्या त्या आता ५५ होणार आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ जागा होत्या त्या आता ८४ होणार आहेत.
जळगाव जिल्हा परिषदेच्या ६७ जागा होत्या त्या आता ७७ होणार आहेत.
धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ जागा होत्या त्या आता ६२ होणार आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ जागा होत्या त्या आता ६२ होणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ जागा होत्या त्या आता ८३ होणार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागा होत्या त्या आता ७७ होणार आहेत.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ६२ जागा होत्या त्या आता ७० होणार आहेत.
जालना जिल्हा परिषदेच्या ५६ जागा होत्या त्या आता ६३ होणार आहेत.
परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागा होत्या त्या आता ६० होणार आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या ५२ जागा होत्या त्या आता ५७ होणार आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या ६० जागा होत्या त्या आता ६९ होणार आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेच्या ६३ जागा होत्या त्या आता ७३ होणार आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ५५ जागा होत्या त्या आता ६१ होणार आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागा होत्या त्या आता ६६ होणार आहेत.
अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ जागा होत्या त्या आता ६६ होणार आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ जागा होत्या त्या आता ५८ होणार आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ जागा होत्या त्या आता ५७ होणार आहेत.
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६० जागा होत्या त्या आता ६८ होणार आहेत.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६१ जागा होत्या त्या आता ६९ होणार आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागा होत्या त्या आता ६४ होणार आहेत.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ जागा होत्या त्या आता ५८ होणार आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागा होत्या त्या आता ५९ होणार आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागा होत्या त्या आता ६२ होणार आहेत.
वर्धा जिल्हा परिषदेच्या ५२ जागा होत्या त्या आता ५७ होणार आहेत.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ५१ जागा होत्या त्या आता ५७ होणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा ‘इतक्या’ वाढणार PDF मध्ये
👇👇👇👇👇












































































