Last Updated on 24 Jun 2025 6:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रम : एक डिजिटल क्रांती
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे ‘ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल’ या उपक्रमांतर्गत पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आणि डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रमाची सुरूवात केलेली आहे.
या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोध, निर्णयांची अंमलबजावणी आणि परीक्षण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करता येईल.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit ➤ आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण ➤ ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक ➤ एकूण १८ देशांमधून महा... Read more











































































