Last Updated on 03 Dec 2021 4:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यातील पोलीस निरीक्षकांना पोलीस उपाधीक्षक/एसीपीपदी केली बढती
मुंबई |
बढती आज होईल उद्या होईल अशा प्रतीक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून गृहविभागाकडून आदेश जारी करून राज्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली.
करोनामुळे राज्यातील पोलीस दलातील अनेक बदल्या व बढत्या रखडल्या होत्या. त्याला अखेर गुरूवारी मुहूर्त मिळाला असून राज्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.
९०, ९१ , ९२ क ९३ च्या बँचमधील अधिकाऱ्यांना बढती दिल्याने राज्यात रिक्त असलेली एसीपींची पदे आता भरली जातील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी एसीपी बनले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राजकुमार सोनावणे,यशवंत गवारी,आत्माराम प्रधान,प्रदीप पाडवी,आंबादास भुसारे,पद्माकर घनवट,राजे नूरमहांमद,बाळासाहेब केदारे,श्रीमती मीनाक्षी राणे,बालाजी सोनटक्के,मारोती थोरात,प्रदीप लोंढे, हेमंत नरहरी शिंदे,संपत ज्ञानोबा भोसले,संजयकुमार सुबराव बाबर,श्रीमती मृदुला रोहीत दिघे,श्रीमती आश्लेषा जितेंद्र हुले,श्रीमती सीमा दीपक मेहेंदळे,श्रीमती संगिता दिलीप पाटील,श्रीमती प्रतिभा संजीव जोशी,अपर्णा व्यकंटेश मराठे आदींचाही पदोन्नतीमध्ये समावेश आहे.
मुंबई पोलीस दलातील दत्तात्रय शिंदे, श्रीनिवास पन्हाळे, सुर्यकांत बांगर, नितीन बोबडे, रवी सरदेसाई, धर्मेंद्र कांबळे, सावळाराम आगवणे, श्रीराम कोरेगावकर, दिवाकर शेळके, शशिकांत माने, जगदेव कालापाड, मृत्यूंजय हिरेमठ, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, संजय जगताप, हरीष गोस्वामी, दीपक निकम, किशोर गायके, सुहास हेमाडे, जयंत परदेशी, सुधीर कार्लेकर, दिनकर शिलवते, शरद ओहोळ, मुरलीधर कारकर, विठ्ठल शिंदे, नामदेव शिंदे, बाबासाहेब साळुंखे, शक्तीप्रसाद थोरात यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलातच नव्याने पदभार सुपुर्द करण्यात आला आहे.














































































