Last Updated on 12 Sep 2025 3:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
पुणे – सर्वसाधारण, सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
मुंबई । राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सांगलीचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं आहे. तसेच साताऱ्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे.
महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ता समीकरणे बदलणार असून, नवीन चेहऱ्यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते.
ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदाच्या निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. दोन ते अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेलल्या होत्या.
असे असेल आरक्षण…
सर्वसाधारण : नाशिक, पुणे, छ. संभाजीनगर, सिंदुदुर्ग, रायगड, बुलढाणा, यवतमाळ, जळगाव
सर्वसाधारण महिला : ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली-
अनुसुचित जमाती : पालघर, नंदूरबार
अनुसुचित जमाती महिला : अहिल्यानगर, अकोला, वाशिम
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : धुळे, रत्नागिरी, सातारा, जालना, नांदेड
अनुसुचित जाती : वर्धा, परभणी
अनुसुचित जाती महिला : बीड, चंद्रपूर
जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण संपूर्ण यादी
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)














































































