Last Updated on 08 Dec 2025 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जुनेखेड (ता.वाळवा) येथील जेष्ठ समाजसेवक राजाराम गुंडा जाधव वय (८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे ते अनुयायी होते. सामाजिक आंदोलन, मोर्चेत कायम ते अग्रेसर असत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी दि. १० रोजी कृष्णाकाठी होणार आहे.









































































