Last Updated on 05 Aug 2025 4:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांचा पुढाकार
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रात राजाराम बापू शिक्षण व उद्योग समूहातील ५ हजार कर्मचारी,अधिकारी,शिक्षक व प्राध्यापकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकते नुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमत युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या आरोग्य शिबिरांचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, कृष्णेचे शिल्पकार स्व.जयवंतराव भोसले, श्रीमती कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.शामराव पाटील, प्राचार्य आर.डी.सावंत, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, पुष्पलता खरात, डॉ.नरसिंह देशमुख, डॉ.एन. टी.घट्टे, संदीप पाटील, आयबीएफचे विकास राजमाने, विश्वजित पवार, कृष्णा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी विशाल मोहिते,आबीद मोमीन, देवराज देशमुख, दिग्विजय पाटील, प्राचार्य एन.आर.मुजावर, अनुप करांडे, इलियास पिरजादे, साजिद रोटीवाला यांच्या सह समूहातील मान्यवर उपस्थित होते.
राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहातील राजारामबापू साखर कारखाना,राजारामबापू बँक,राजारामबापू दूध संघ,कासेगाव शिक्षण संस्था व राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील सर्व कामगार,अधिकारी व शिक्षक-शिक्षिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहे. आजच्या धावपळीच्या युगात बऱ्याच वेळा आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून काही तरी अघटीत घडते. हे टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतल्याची प्रतिक्रिया युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केली.
आपले युवा नेतृत्व आपल्या आरोग्याची काळजी घेत असल्याबद्दल राजारामबापू समूहातील कामगार,अधिकारी व शिक्षकांनी समाधान व्यक्त करून ते या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































