Last Updated on 16 Aug 2025 1:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
साखराळे येथे आ. जयंतराव पाटील यांची उपस्थिती
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव सुरूल, कारंदवाडी तसेच तिप्पेहळळी-जत युनिट कार्यस्थळावर देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संचालक शैलेश पाटील, संचालक हणमंत माळी, संचालक दादासाहेब मोरे, कामगार संचालक मनोहर सन्मुख यांच्या हस्ते चारही युनिट कार्यस्थळावर ध्वजारोहन करण्यात आले. साखराळे येथील ध्वजारोहण सोहळ्यात माजी मंत्री आ. जयंतराव पाटील सहभागी झाले होते.
यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानातून आपणास मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवत स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आपले कर्तव्य देशाला समर्पित भावनेने करण्याचे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.
सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड,दत्तात्रय गायकवाड,जयवंत पाटील,प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चारही युनिटवर सुरक्षा रक्षकांनी ध्वजसंचालन करून ध्वजास मानवंदना दिली. विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल,मॉडर्न हायस्कुल, नूतन मराठी विद्यालय व प्रियदर्शनी बालवाडीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शंभूराजे पाटील, ईशान पाटील,आरोही कांबळे,अनिस जाधव,स्वरांजली जाधव विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर भाषणे केली. विद्यानिकेतन च्या विद्यार्थिनींनी ‘तूही कर्मा’ हे देशभक्तीपर गीत सादर केले.
संचालक राजकुमार कांबळे, डॉ.योजना शिंदे-पाटील, कामगार संचालक विकास पवार, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, प्राचार्य अजित पाटील, मुख्याध्यापक जयसिंग कदम, मुख्याध्यापक राजेंद्र जांभळे, सचिव डी. एम.पाटील, विजय मोरे, सुनिल सावंत, राजेंद्र चव्हाण, तानाजी खराडे, संताजी चव्हाण, संभाजी सावंत, संग्राम चव्हाण, उमेश शेटे, नंदकिशोर जगताप यांच्यासह अधिकारी – कर्मचारी, कुटुंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते.














































































