Last Updated on 27 Sep 2025 5:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सांगली जिल्ह्यात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरल्याबद्दल केंद्र शासन व रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या मार्फत सांगली येथे राजारामबापू साखर कारखान्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कारखान्याच्या आर्थिक सक्षमता व शिस्तीचे कौतुक करण्या त आले.
खा.विशाल पाटील, केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर आयुक्तालयाचे सहआयुक्त रोहित जोशी, ज्येष्ठ उद्योजक दीपक शिंदे,अँड. विद्याधर आपटे, राज्य जीएसटी,अन्वेषण विभाग पुणेचे उपायुक्त सुनील कानगुडे, केंद्रीय जीएसटी सांगली विभागाचे सहायक आयुक्त यु.के.सतीश यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाचे मुख्य अकाऊंटंट संतोष खटावकर यांनी जेष्ठ उद्योजक दीपक शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान स्विकारला. यावेळी
‘राजारामबापू’च्या अकाऊंट विभागाचे आनंदा देवकुळे,कैलास कोळी,विशाल दिंडे,सुजित पाटील,रमेश शिंदे तसेच कर सल्लागार ॲड. किशोर लुल्ला,मोहनराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे,उद्योजक उज्वल साठे,विनोद पाटील,शांतिनाथ पाटील यांच्यासह करदाते,कर सल्लागार उपस्थित होते.
रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, प्रमोद चौगुले,विनायक काळे,स्वप्नील पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.













































































