Last Updated on 09 Jan 2025 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने चारही युनिटकडे दि.१५ डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसास रक्कम रुपये ८७ कोटी ६ लाख ५५ हजार ७०८ हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,ऊसतोड मजूर यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मधील २० लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री.पाटील म्हणाले, साखराळे,वाटेगाव- सुरुल,कारंदवाडी युनिटमध्ये दि.१६ नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबरमध्ये ३९ हजार १७० मे. टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याचे प्रति टन रुपये ३ हजार २०० प्रमाणे रुपये १२ कोटी ५३ लाख ४४ हजार हे दि.३० डिसेंबर २०२४ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. दि.१ डिसेंबर ते दि.१५ डिसेंबरमध्ये तीन युनिटमध्ये २ लाख २ हजार ४८ मेट्रीक टन ऊस गाळप केलेला आहे. त्याचे प्रतिटन रुपये ३ हजार २०० प्रमाणे रुपये ६४ कोटी ६५ लाख ५५ हजार ५ रुपये दि. ९ जानेवारी २०२५ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत.
तसेच तिप्पेहळ्ळी-जत युनिटकडे दि.१६ नोव्हेंबर ते दि.३० नोव्हेंबरमध्ये ३२ हजार ९१८ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याचे प्रतिटन रुपये ३ हजार प्रमाणे रुपये ९ कोटी ८७ लाख ५६ हजार ७०३ हे दि.८ जानेवारी २०२५ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत.
आजअखेर चारही युनिटमध्ये ७ लाख १९ हजार ३० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. यातून ७ लाख ९३ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. आम्ही लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचाराने,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम करीत आहोत. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक देवराज पाटील, विठ्ठल पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील,चिफ अकौंटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 28 Jul 2026 7:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit विदर्भ, कोकण अन् घाट माथ्यावर सतर्कतेचा इशारा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढणार मुंबई । बंगालच्... Read more












































































