Last Updated on 08 Sep 2024 1:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाच्या साखराळे,वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी व तिप्पेहळळी (जत) युनिट कार्यस्थळावर ‘श्रीं’चे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सह सर्वांना सुखी,समृध्द आणि आरोग्यदायी जीवन लाभो,तसेच कारखान्याच्या चारही युनिटचा गळीत हंगाम सुरळीत पार पडो, अशी प्रार्थना कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी साखराळे येथे श्रींच्या चरणी केली.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते साखराळे युनिट,संचालक रामराव पाटील यांच्या हस्ते वाटेगाव-सुरुल,संचालक प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कारंदवाडी युनिट,संचालक दादासो मोरे यांच्या हस्ते तिप्पेहळळी (जत) युनिट कार्यस्थळावर श्रींची प्रतिष्ठापना मोठया उत्साहात करण्यात आली.
याप्रसंगी आर.डी.माहुली,शंकरराव भोसले, तानाजी खराडे,डी.एम.पाटील,विजय मोरे, सुनील सावंत,राजेंद्र चव्हाण,महेश पाटील, प्रेमनाथ कमलाकर,संताजी चव्हाण,सुदाम पाटील, संभाजी सावंत,संग्राम चव्हाण,उमेश शेटे,विश्वनाथ पाटसुते,संजय सत्रे,तसेच खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.










































































