Last Updated on 19 Feb 2024 9:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारतीय शुगर या साखर उद्योगातील नामवंत संस्थेच्या वतीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांना कोल्हापूर येथील शानदार सोहळ्यात ‘सर्वोत्तम कार्यकारी संचालक ‘या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,राजारामबापू’चे उपाध्यक्ष विजयराव पाटील,सौ.वैदेही माहुली,कु.वैभवी माहुली,नॅशनल शुगरचे संचालक नरेंद्र मोहन, भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे,दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील,प्रशांत परिचारक,एम.जी.जोशी,डी.एम.रास्कर प्रामुख्याने उपस्थित होते.
आर.डी.माहुली पुरस्कार घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले,माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी माझ्यावर दृढ विश्वास दाखवीत मला प्रथम चीफ अकौंटंट,नंतर सचिव व कार्यकरी संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली,त्यामुळे मी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीत योगदान करू शकलो,हे मी माझे भाग्य समजतो. मला मिळालेल्या सर्वोत्तम कार्यकारी संचालक या पुरस्काराने भविष्यात अधिक गतीने काम करण्यास ऊर्जा मिळेल.
हेही वाचा – प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने ‘राजारामबापू’ने हाती घेतले ‘समृध्द भूमी अभियान’
याप्रसंगी संचालक बाळासाहेब पवार,विठ्ठल पाटील,कार्तिक पाटील,प्रदीपकुमार पाटील,रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,दिलीपराव देसाई,दादासो मोरे,प्रताप पाटील,शैलेश पाटील,रामराव पाटील,दिपक पाटील, रमेश हाके,दिलीप देसाई,वैभव वसंतराव रकटे,हणमंत माळी,राजकुमार कांबळे, सौ.मेघा पाटील,जनरल मॅनेंजर एस.डी. कोरडे,सचिव डी.एम.पाटील,विजय मोरे, सुनिल सावंत,प्रेमनाथ कमलाकर,तसेच साखर उद्योगातील मान्यवर,कारखान्याचे अधिकारी व नातेवाईक उपस्थित होते.









































































