Last Updated on 04 Aug 2025 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
४५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान…
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल,कारंदवाडी व तिप्पेहळ्ळी-जत युनिटचे कर्मचारी-अधिकारी,तसेच आरआयटीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान करून त्यांना अभिवादन केले. ४५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या ४० वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
साखराळे येथे आरआयटीचे संचालक डॉ. पी.व्ही.कडोले यांच्या हस्ते स्व.बापूंच्या प्रतिमे चे पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. येथे २२३ कर्मचारी, अधिकारी व आरआयटीच्या विद्यार्थी- विद्या र्थिनींनी रक्तदान केले. राजारामबापू ब्लड बँक व कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
वाटेगाव-सुरूल येथे ८२, कारंदवाडी येथे ६२ ,तर तिप्पेहळ्ळी (जत) येथे ८९ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. सिद्धी विनायक (मिरज),अर्पण (कोल्हापूर) व जत ब्लड बँकेने रक्त संकलन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव डी.एम.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर व अधिकाऱ्यांनी संयोजन केले.
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार
राजारामबापू चे युवा अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजारामबापू साखर कारखान्यातील १ हजार सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी रक्त,लघवी,रक्तदाब, रक्तातील साखर,तसेच डोळे तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार ईसीजीही घेण्यात आला. यावेळी प्रथमच कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली.














































































