Last Updated on 13 Nov 2021 4:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तुम्ही किती ही मोठे झालात तरी कार्टुन हे आपल्या बालपणीची कधीही पुसू नये अशी आठवण आहे. जवळपास मागच्या दोन ते तीन पिढ्यांपासून आज पर्यंत अनेक लोकांच्या मनावर ज्यांनी कार्टुनरुपी आधिराज्य गाजवले ते म्हणजे मिकी माऊस. मात्र ह्या मिकि माऊस पात्राची प्रतिकृती कशी साकार झाली. मिकि माऊस सारख्या दिसणाऱ्या ओस्वॉलड द लकी रॅबिट या सश्या सारख्या दिसणाऱ्या कार्टुन पात्रावरुन मिकि माऊस हे पात्र जन्माला आले. मात्र या ओस्वॉलड द लकी रॅबिटवर आधारित शॉर्ट फिल्म 1928 ला आली ज्याची कॉपी 90 वर्षांनी मिळाली आहे.
जपानमध्ये मिळाली कॉपी
1928 साली ओस्वॉलड द लकी रॅबिट या कार्टुनची पहिली शॉर्ट फिल्म आली. मात्र ही शॉर्ट फिल्म कोनाचक़डे उपलब्ध नव्हती. त्यामुळे वर्ल्ड डिजनी त्या कॉपीच्या शोधात होती. अखेर जपानमध्ये या शॉर्ट फिल्मची कॉपी भेटली आहे. एका 86 वर्षीय वृद्ध व्यक्ती कडे ती सापडली असून, शाळेत असताना 500 येन म्हणजे त्याकाळी 300 रुपयांना ती सीडी त्यांनी विकत घेतली होती. त्यावेऴी वर्ल्ड डिझनीने ओस्वॉलडवर आधारित 26 शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या. मात्र त्यातील एकही शॉर्ट फिल्मची कॉपी कोनाचकडे मिळत नव्हती. मात्र अखेर 90 वर्षांनी ही कॉपी मिळाल्याने सगळे खुश झाले आहेत.
अशी झाली मिकि माऊसची निर्मीती
खरतर काही व्यवसायीक भागीदारी तील वादामुळे ओस्वॉर्लड या कार्टुन वरील हक्क डिझनीला सोडावे लागले. सर्व प्रथम वर्ल्ड डिझनीने ओस्वॉर्ल्ड ची निर्मीती केली, मात्र नंतर हक्क सोडावे लागल्याने मग त्याच कार्टुनचा आधार घेत मिकी माऊसची निर्मीती केली. त्यावेळी बनवण्यात आलेल्या मिकी माऊसची लोकप्रियता आजही इतक्या वर्षांनंतर तितकीच आहे.









































































