Last Updated on 02 Dec 2021 8:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जमिनीचा सरकारी भाव किती आहे हे जाणून
राज्यात जमीन खरेदी-विक्री असे भरपूर व्यवहार हे होत असतात.आपल्या जमिनीची सरकारी किंमत किती आहे हे कसे जाणून घ्यायचे व जमीन कुठल्या भावात द्यायची याची सरकारी किंमत किती हे जाणून घेता येते मोबाइलच्या सहाय्याने.
जमिनीचा सरकारी दर
जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला igrmaharashtra.gov.in असे सर्च करायचे आहे.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल.यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे
यानंतर बाजारमूल्य दर पत्रक नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल.
आता आपल्याला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे, त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचे

या पेजवर सगळ्यात आधी डावीकडे Year या रकान्यात तुम्हाला वर्षं निवडायचे
आता मला चालू वर्षासाठीचे दर पाहायचे असेल 2021-22 हे वर्षं निवडावे
इथं उजवीकडे असलेल्या Language या रकान्यात जाऊन तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचे नाव दिसून आपोआप आलेलं दिसेल.पुढे तालुका आणि गावाचे नाव निवडायचे
गावाचे नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील.
यात सुरुवातीला Assessment type मध्ये जमिनीचे प्रकार दिसतील. या प्रकारानुसार पुढे Assessment range आणि रेट म्हणजेच जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल. ही जी किंमत इथं दिलेली असते ती प्रती हेक्टरी असते.
गावातील जमिनीचा सरकारी दर तुम्हाला हेक्टरच्या स्वरुपात दिसेल.वेगवेगळ्या जमिनींचा सरकारी दर पाहू शकाल.जिरायती शेतजमीन,बिनशेती जमिनी,हायवेवरील जमिनी,गावठाण जमीन,औद्योगिक क्षेत्रातील जमिनी आदी जमिनीचा सरकारी दर हेक्टरच्या स्वरुपात तुम्हाला बघायला मिळेल.
जमिनीचा सरकारी भाव किती आहे हे जाणून














































































