Last Updated on 05 Oct 2022 1:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी 4 (ऑक्टोबर रोजी) राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.दरम्यान,राज्यात सरपंचाची निवड थेट जनतेतूनच होणार आहे.
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649 तसेच नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.मात्र,ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी ग्रामविकास विभागाला पत्र लिहून प्रशासक नेमण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
![]()
त्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने आज 4 (ऑक्टोबर रोजी) मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यानंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649 तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता दिनांक 31 मे 2022 रोजी प्रसिध्द केलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.या निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : मंगळवार दिनांक 31 मे 2022
प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक : गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2022
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी : गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्विकारण्यात येणार )
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे : शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022
![]()

राज्यातील जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी
ठाणे : 58
पालघर : 63
रायगड : 240
रत्नागिरी : 222
सिंधुदुर्ग : 325
नाशिक : 196
धुळे : 108
जळगाव : 140
अहमदगर : 204
नंदुरबार : 65
पुणे : 219
सोलापूर : 189
सातारा : 315
सांगली : 452
कोल्हापूर : 475
औरंगाबाद : २१५
बीड : 704
नांदेड : 176
उस्मानाबाद : 166
परभणी : 126
जालना : 266
लातूर : 351
हिंगोली : 62
अमरावती : 263
अकोला : 266
यवतमाळ : 99
बुलडाणा : 279
वाशिम : 287
नागपूर : 237
वर्धा : 111
चंद्रपूर : 56
भंडारा : 362
गोंदिया : 345
गडचिरोली : 27
हेही वाचा…









































































