Last Updated on 28 Sep 2022 8:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली । लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान 2021 साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत.
देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून संरक्षण दलप्रमुख हे पद रिक्त होते.
माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूच्या नऊ महिन्यांनंतर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल चौहान यांनी 40 वर्षात लष्करी कारकिर्दीत कमांड, स्टाफ आणि इंस्ट्रूमेंटल पदांवर काम केलं होतं. शिवाय त्यांना जम्मू-काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. त्यांचे कार्य हे संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातूनच समोर मांडण्यात आले आहे. ते एक निवृत्त अधिकारी असले तरी त्यांच्या अनुभवाचा भारतीय लष्करामध्ये मोठा फायदा होणार आहे.
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जनम 18 मे 1961 रोजी झाला. त्यांच्याकडे 1981 ला व 11 गोरखा रायफल्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी मेजर जनरल पदावर अताना बारामुला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात नेतृत्व केले. त्यांच्याकडे ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निवृत्त होईपर्यंत म्हणजेच मे 2021 पर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी होती.
अनिल चौहान (निवृत्त) यांना लष्करातील परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.









































































