Last Updated on 11 Sep 2025 3:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्याहीक्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. असे ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
बँक खात्यात पैसे आले का ? असं तपासा स्टेटस
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल.
बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Jan 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन... Read more
















































































