Last Updated on 04 Dec 2021 3:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू अजाज पटेलचा जन्म 1988 साली मुंबईत झाला.ज्यानंतर 1996 मध्ये अजाजचे संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झाले.दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजाजने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी आज मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली आहे.
जन्माने मुंबईकर असलेल्या अजाजसाठी हा सामना खूप खास होता.कारण जन्मभूमी असलेल्या मुंबईत हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.या सामन्यात त्याला मुंबईच्या खेळपट्टीकडून भरपूर मदत मिळाली आणि त्याचा फायदा घेत त्याने इतिहासही रचला आहे.
भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून फिरकीपटू अजाज पटेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.या मूळ मुंबईकरानेच भारताच्या पहिल्या डावातील सर्व १० बळी घेण्याचा करिष्मा केला.
…म्हणून आपला मोर्चा फिरकी गोलंदाजीकडे
एजाजचा जन्म हा मुंबईमध्ये झाला,पण वयाच्या आठव्या वर्षी त्याच्या कुटुंबियांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. एजाज हा सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करायला,पण त्यानंतर त्याने आपला मोर्चा फिरकी गोलंदाजीकडे वळवला.त्यावेळी क्रिकेट विश्वात एकामागून एक दिग्गज वेगवान गोलंदाज होते आणि सर्वच वेगवान गोलंदाज उंच होते.वेगवान गोलंदाज उंच असला तर त्याचा जास्त फायदा होतो.कारण बाऊन्सर टाकण्यासाठी तुम्हाला उंचीची चांगली मदत होऊ शकते.
पण एजाजची उंची ही पाच फुट सहा इंच एवढी होती.त्यामुळे आपला निभाव वेगवान गोलंदाजीमध्ये लागणार नाही,असे कदाचित एजाजला वाटले असावे आणि त्यानंतर त्याने आपला मोर्चा फिरकी गोलंदाजीकडे वळवला.डावखुरी फिरकी गोलंदाजीला सुरुवात केल्यावर एजाजला चांगलेच यश मिळायला लागले आणि त्यानंतर त्याने फिरकी गोलंदाजीवरच आपले लक्ष केंद्रीत केले.
विचित्र योगायोग : कुंबळे आणि एजाज पटेल यांच्या ऐतिहासिक विक्रमाचे हे दोन माजी खेळाडू बनले साक्षीदार,दोन्ही वेळेस स्टेडियममध्ये उपस्थित
1999 मध्ये, जेव्हा कुंबळेने पाकिस्तानसाठी सर्व 10 विकेट घेतल्या,तेव्हा द्रविड आणि श्रीनाथ त्याच्यासोबत भारतीय संघाचा भाग होते.त्याचवेळी एजाज पटेलने भारताच्या सर्व विकेट घेतल्या,तेव्हा द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पॅव्हेलियनमध्ये बसून सामना पाहत होता.तर जवागल श्रीनाथ सामनाधिकारी म्हणून स्टेडियममध्ये उपस्थित होते.
जन्मभूमीत जन्माच्या देशाविरुद्धच सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी कामगिरी
१०/११९ – अजाज पटेल न्यूझीलंड विरुद्ध भारत, २०२१*
६/४९ – गुलाबभाई रामचंद भारत विरुद्ध पाकिस्तान, १९५५
६/६३ – अँडी कॅडिक इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, २००२
६/७७ – डेव्हॉन माल्कम इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, १९९०
भारतीय दिग्गज अनिल कुंबळेनेही त्याचे अभिनंदन केले
एजाजच्या या कामगिरीवर जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानविरुद्ध एका डावात 10 विकेट घेणारा भारतीय दिग्गज अनिल कुंबळेनेही त्याचे अभिनंदन केले. “क्लबमध्ये स्वागत आहे एजाज पटेल, उत्तम गोलंदाजी,” कुंबळेने ट्विट केले.
बीसीसीआयनेही कौतुक केले आणि एजाजचा व्हिडिओ शेअर केला आणि एक खास कामगिरी सांगितली.












































































