Last Updated on 25 Dec 2021 7:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण २४७ जागा भरण्यात येणार आहेत.
पात्रता निकष
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती २०२२ नोटिफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे कॉम्प्युटर बेसिक टायपिंग, इंग्रजी टायपिंगमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. उमेदवारांचा टायपिंगचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट असावा.
वयोमर्यादा
अर्जाच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.
शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार २३ डिसेंबर २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिपिक भरतीसाठी उमेदवारांना ६ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
|
पदाचे नाव |
Clerk |
|
एकूण पदे |
247 Vacancies |
|
अधिकृत वेबसाईट |
https://bombayhighcourt.nic.in/ |
|
अर्जाची पद्धत |
Online Application |
|
नोकरी ठिकाण |
Mumbai |
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
6th January 2022 |
|
Importants Links |
|
|
जाहिरात |
|
|
अधिकृत वेबसाईट |
|













































































