Last Updated on 04 Jul 2020 11:50 AM by
असे असेल या महिन्याचे राशी भविष्य
मेष
आरोग्याची काळजी घ्या
रवि-बुध राहू तृतीयस्थानी,शुक्र धनस्थानात,शनी कर्म स्थानात,मंगळ बारावा म्हणजे व्यय स्थानात असल्यामुळे शरीर प्रकृतीच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे उष्णतेचे विकार,ताप सर्दी-खोकला,अनिद्रा अशा समस्या उद्भवण्याचा संभव आहे परंतु वेळेत औषध-पाणी व आवश्यकतेनुसार विश्रांती घेतल्यास लवकर बरे व्हाल.गुरु गोचर भाग्यस्थानात असल्यामुळे सकारात्मक विचार येतील.नोकरी उद्योगधंद्यात परत एकदा नव्याने सुरुवात कराल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील.
वृषभ
नोकरीत बदल संभवतो
रवि-बुध-राहू धनस्थानी.राशी स्वामी शुक्र स्वगृही,शनी भाग्यात,मंगळ लाभात.गुरुचे अष्टमातील भ्रमण काहीसे त्रासदायक ठरणारे आहे.नोकरीत बदलीचे वारे वाहतील.उद्योग व्यवसायात काहीशी शिथिलता जाणवेल.मात्र उत्तरार्धात अधिक गतीने काम करावे लागेल.कौटुंबिक बाबतीत सहचारिणीची चांगली साथ मिळेल तर उद्योगात सहकारी मदत करतील.जुनी येणी वसूल होतील.अतिरीक्त खाणे-पिणे झाल्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो.त्यादृष्टीने काळजी घ्यावी.
मिथुन
विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील
रवि-बुध-राहू प्रथम स्थानात,अष्टमात शनी,व्ययात शुक्र, कर्मस्थानी मंगळ काहीसे संमिश्र ग्रहमान असले तरी गोचर गुरु परत सप्तमात आल्यामुळे विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.अनिष्ट शनीमुळे जुने दुखणे पुन्हा डोके वर काढण्याचा धोका आहे.त्या दृष्टीने काळजी घ्यावी.शत्रूपासून सावधगिरी बाळगावी लागेल.जवळ बसणारेच निंदक याचा अनुभव येईल.शांत डोक्याने वाटचाल केल्यास अडचणी दूर करण्याची क्षमता तुमच्या ठायी निर्माण होईल. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.कष्टाच्या मानाने दाम पण मिळेल.गेल्या तीन महिन्यातील निराशाजनक स्थिती दूर होऊन नव्या जोमाने कामाला लागाल.

कर्क
आर्थिक कोंडी होईल
रवि-बुध-राहु व्ययात.शुक्र लाभात,गुरू अष्टमस्थानी,षष्ठमस्थानी शनी,सप्तमात मंगळ,भाग्यात गोचर अनिष्ट ग्रहांमुळे आर्थिक,मानसिक शारीरिक या सर्व बाबतीत त्रासाचा महिना आहे त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल मिळकतीच्या दुप्पट खर्च होईल.भाऊबंदकीतले वाद निर्माण होतील.त्यासाठी संयमाने मार्ग काढणे हिताचे ठरेल.व्यवसायक वसुली,अचानक उद्भवलेले खर्च यांचा ताळमेळ घालताना त्रास होईल.
सिंह
उष्णतेचे विकार उद्भवतील
गोचर गुरू पंचमात,शनी षष्ठमात,मंगळ अष्टमात,शुक्र कर्मस्थानी,लाभात रवि-बुध-राहू.उष्णतेचे विकार उद्भवतात. त्या दृष्टीने काळजी घ्यावी. नोकरी,उद्योग व्यवसायातील अडचणी दूर होतील.आपले कामच नोकरी टिकून ठेवण्यास उपयोगी ठरेल.कामाच्या व्यापामुळे स्वभाव चिडचिडा बनेल.याबाबतीत धैर्याने आणि आपुलकीने घरातील व्यक्ती,नोकरी-उद्योगातील सहकारी यांच्याशी चांगले वर्तन ठेवल्यास ते मदत करतील.पती-पत्नीत वादविवाद होतील.त्यादृष्टीने काळजी घ्यावी.
कन्या
थकवा जाणवेल
गोचर गुरू चतुर्थात,शनी पंचमात,मंगळ सप्तमात,शुक्र भाग्यात,रवि-बुध-राहू दशमात.गेल्या तीन महिन्यात लागलेली विश्रांतीची सवय आता अधिकचे काम लागल्यामुळे त्रासाची ठरेल.थकवा जाणवल्यामुळे स्वभाव चिडचिडा बनेल.महिन्याच्या उत्तरार्धात कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान प्राप्त होईल.विवाह इच्छुकांचे विवाह लांबणीवर पडतील.कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.
तूळ
शारीरिक व मानसिक त्रास जाणवेल
गुरु तृतीयस्थानी,शनी चतुर्थात,मंगळ षष्ठात,शुक्र अष्टमात,रवि-बुध-राहू भाग्यात.आपण इतरांच्या मदतीला धावून जाता.परंतु तुमच्यावरती वेळ आल्यावर कोणी येत नाही याचा अनुभव येईल.नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी टाकल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास जाणवेल.दिलेले काम वेळेत पूर्ण करणे ही आपली वृत्ती आपल्यासाठी फायद्याची ठरेल.नोकरीच्या ठिकाणी स्टाफ कमी करण्याचा विषय पुढे आला तरी आपले नाव त्यामध्ये नसेल.
वृश्चिक
कष्टाचे चीज होईल
गुरु धनस्थानात,शनी तृतीयात,मंगळ पंचमात,शुक्र सप्तमात,रवि-बुध-राहू अष्टमात.शारीरिक प्रकृती अधिक बळकट होण्यास हा महिना चांगला आहे.छोटे-मोठे आजार उद्भवतील व लगेच बरे पण होतील.हाती घेतलेल्या कष्टाचे चीज होऊन अर्थकारण सुधारेल.वैवाहिक सौख्य मिळेल,घरात मंगलकार्ये होतील.तर आर्थिक,व्यावसायिक उत्कर्ष संभावतो.

धनु
पत खराब होईल
गुरु प्रथम स्थानी,शनि द्वितीयात,मंगळ चतुर्थात,शुक्र अष्टमात,रवि-बुध-राहू सप्तमात.संमिश्र ग्रहमानामुळे स्वास्थ्य बिघडण्याचा संभव असून त्यादृष्टीने काळजी घ्यावी. वाहन जपून चालवावे.छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.चतुर्थातील मंगळ शारीरिक तापमान वाढवितो. चिडचिडेपणामुळे शत्रू निर्माण होतील.उसने घेतलेले पैसे वेळेवरती परत न गेल्यामुळे पत खराब होईल.उद्योग,व्यवसायात सहकारी मदत करणार नाहीत.अधिकच्या खर्चामुळे कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील.त्यासाठी काळजी घेतली तर काळजी करावी लागत नाही या युक्तीने मार्ग काढणे आवश्यक ठरेल.
मकर
हाती घेतलेल्या कामात यश येईल
गुरू-केतू व्ययात,शनि स्व राशीत,मंगळ पराक्रमात,शुक्र पंचमात,रवि-बुध-राहू षष्ठात,गुरु बदलामुळे गेल्या तीन महिन्यात
जे सुख अनुभवले,त्यात थोडीफार कमतरता जाणवेल.मात्र आपला चंचल स्वभाव व आत्मविश्वास यामुळे हाती घेतलेल्या कामात यश देईल.आपण पावलोपावली केलेली मदत समोरचा क्षणात विसरून जातो,त्यामुळे तुम्ही चिडचिड बनता आणि त्याचा कमी-अधिक प्रमाणात तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. या दृष्टीने काळजी घेणे हितावह ठरेल.
कुंभ
आर्थिक कोंडी फुटेल
गुरू-केतू लाभात,शनी व्ययात,मंगळ धनस्थानात,शुक्र चतुर्थात,रवि-बुध-राहू पंचमात.आपण पाठीमागे जी पुण्याची कामे केली असतील त्याची फलश्रुती येईल.आर्थिक कोंडी फुटण्याचा फुटण्यास मदत होईल.आपले तर्क बरोबर येतील.सकारात्मक पावले टाकल्यामुळे घेतलेले निर्णय अचुक ठरवून रेंगाळलेली कामे पूर्णत्वाकडे जातील. व्ययातील शनि प्रकृतीची चिंता निर्माण करेल. त्यादृष्टीने शरीर स्वास्थ्य जपणे आणि त्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल.
मीन
आय-व्यय सम-समान राहील
मंगळ प्रथमस्थानी,तृतीयात शुक्र,चतुर्थात रवि-बुध-राहू,दशमात गुरू,लाभात शनी,कर्मस्थानातील गुरू आपल्यासमोर कामांचा डोंगर उभा करणार आहे.त्यासाठी महत्त्वाची आणि कमी महत्त्वाची असा प्राधान्यक्रम ठरवून काम करणे हिताचे ठरेल.अतिरिक्त श्रम आणि मिळणारे उत्पन्न याचा विचार केला तर फायदा नाही व तोटा ही नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.अतिश्रमाने तब्येत बिघडणार नाही याची काळजी घेणे उचित ठरेल.आय-व्यय सम-समान राहील.कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील.
अधिक बडवे
ज्योतिष प्रविण,ज्योतिष प्राज्ज्ञ
भ्रमणध्वनी : 9850818193















































































