Last Updated on 20 Feb 2025 5:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनात आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र परिचय केंद्रात देखील बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई : मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन
नवी मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यासह विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.













































































