Last Updated on 18 Dec 2023 7:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आता पर्यंत प्रशाद योजनेंतर्गत 46 परियोजना आणि स्वदेश दर्शन अंतर्गत एकूण 76 परियोजना स्वीकृत करण्यात आल्या आहेत.ज्यात धार्मिक स्थळांचा समावेश आहे याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळे निश्चीत केली आहेत.महाराष्ट्रात विकासासाठी निश्चित केलेल्या परीयोजनाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
प्रशाद योजनेत नाशिक जिल्ह्यातल्या त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा 52.92 कोटींचा निधी खर्च करून विकास करण्यात येणार आहे.
स्वदेश दर्शन योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरेश्वर, तरकर्ली, विजयदुर्ग येथील चौपाटी आणि खाडी किनाऱ्यांचा 19.06 कोटींचा निधी खर्च करून विकास करण्यात येणार आहे.तर नागपूर जिल्ह्यातल्या वाक -अडासा-धापेवाडा-परादसिंघा-तेलंखंडी- गिराड यांचा 53.96 कितींचा निधी खर्चून विकास करण्यात येणार आहे.
याशिवाय प्रशाद योजनेंतर्गत नवीन परीयोजनेत औरंगाबाद येथील श्री गुरूसनेश्वर शिवालय,उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथील श्रीक्षेत्र राजूर,जालना येथील गणपति मंदिर यांचा तर स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत सिंधू दुर्गचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत हि माहिती दिली.
या संबधीचा प्रश्न श्री. हेमंत पाटील यांनी विचारला होता.
पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियानात (प्रशाद) तथा ‘स्वदेश दर्शन’ (एसडी) योजने अंतर्गत देशभरातील धार्मिक स्थळासह पर्यटन क्षेत्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्राशाशित प्रदेशांना आर्थिक सहाय देण्यात येते.









































































