Last Updated on 09 Mar 2025 5:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील.निवडणुकीआधी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं. याबाबत काही निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होतो का? याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या अर्थसंकल्पात महिला, युवक, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर आणि दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा होणार का? याची शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीच्या घोषणेची आतुरता आहे.. कारण महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन सरकार पाळणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा करण्यात येणार का? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
त्यामुळे या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit ➤ आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण ➤ ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक ➤ एकूण १८ देशांमधून महा... Read more











































































