Last Updated on 12 Jul 2024 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यात एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे2उमेदवार विजयी झाले आहेत.विधान परिषद निवडणुकीच्या गणितात देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम दिसून आली.फडणवीस यांचा 2022 चा धक्कादायक जादुई पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांचा विजय झाला.
10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मॅजिक पॅटर्न दाखवला होता. 2022 च्या निवडणुकींचे मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपुर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती. 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न फडणवीसांनी पुन्हा एकदा खरा करून दाखवला.
महायुती कडून भाजपाचे पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे असे दोन उमेदवार, शिवसेना (एकनाथ शिंदे ) भावना गवळी,कृपाल तुमणे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपच्या पाचही उमेदवारांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या दोन उमेदवारांचा, तर शिवसेना (एकनाथ शिंदे )गटाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.
भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. योगेश टिळेकर 26, अमित गोरखे – 22, पंकजा मुंडे – 26, परिणय फुके 26 आणि सदाभाऊ खोत यांना 26 मते मिळालीत. शिंदे गटाच्या भावना गवळी 24 आणि कृपाल तुमाने 25 आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर 23 आणि शिवाजीराव गर्जे 24 मते मिळाली आहेत.
महाविकास आघाडीचे काँग्रेस कडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर,शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
यात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना 25 मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर यांना 24 मते मिळाली असून महाविकास आघाडी कडून निवडणुकीत रिंगणात असलेले 3 पैकी 2 उमेदवारांचा विजय झाला आहे.
यात महाविकास आघाडी कडून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना केवळ 12 मते मिळाल्या मुळे त्यांना निवडणुकीत पराभव झाला आहे.












































































