Last Updated on 11 Nov 2021 12:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महागाईचा फटका रुग्णांनाही बसणार आहे.15 ते 20 टक्क्यांनी ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्रतिजैविक औषधे तसेच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फटका बसत आहे.
कोणत्या गोळ्या किती रुपयांना मिळणार?
रक्तदाबाची गोळी पूर्वी दहा गोळ्यांची एका स्ट्रीपची किंमत 172 रुपये होती. ती आता 190 झाली आहे. मधुमेहाची एक स्ट्रीप 11 रुपये 30 पैशाला होती. ती आता 18 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. अँटासिडच्या 15 गोळ्यांची किंमत 24 रुपये होती ती आता 37 रुपये झाली आहे. झंडूबाम 35 रुपये होता, तो 40 रुपयांना मिळणार आहे. विक्स इन्हेलर आधी 50 रुपयांचे होते, ते आता 59 रुपयांना मिळणार आहे. खोकल्याच्या एका बॅाटलची किंमत सहा महिन्यात 40 ते 50 रुपयांनी वाढली आहे. डेटॅालची 105 रुपयांची बॅाटल आता 116 रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांच्या किमती 99 रुपयांवरून 110 रुपयांवर गेल्या आहेत. त्वचा रोगावर चालणारे औषध 37 रुपयांसाठी होते, ते आता 46 रुपयांना मिळणार आहे.
खोकल्याच्या एका बॅाटलची किंमत सहा महिन्यात 40 ते 50 रूपयांनी वाढली आहे. डेटॅालची 105 रुपयांची बॅाटल आता 116 रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांच्या किंमती 99 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेल्या आहेत. त्वचा रोगावर चालणारे औषध 37 रुपयांसाठी होते, ते आता 46 रुपयांना मिळणार आहे.














































































