Last Updated on 02 Apr 2025 7:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजे मनरेगातून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 44 हजार 904 हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड पूर्ण झाली आहे. मागील पाच वर्षांतील ही उच्चांकी लागवड असल्याची माहिती पुणे कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयातून देण्यात आली.
राज्यात चालू वर्षी पाऊसमान चांगले राहिले. शासनाकडून रोपवाटिकांनाही अनुदान वेळेत मिळाले. त्यामुळे फळझाडे लागवडी साठी शेतकर्यांना कलमे-रोपांची उपलब्धता वेळेत झाली. मनरेगातून फळझाडे लागवडीच्या केलेल्या नियोजनात शेतकर्यांसह क्षेत्रीय स्तरावरील सर्व कृषी कर्मचारी, अधिकार्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यामुळेच फळझाडांसह मसाला पिके, फुले आदींची उच्चांकी 44 हजार 904 हेक्टरवर लागवड पूर्ण होऊ शकली आहे. असे कृषी आयुक्तालयाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली.











































































