Last Updated on 06 Oct 2021 6:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या त्याच्या विविध शाखांमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण २०५६ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
एकुण जागा : 2056
| पदाचे नाव | जागा | शिक्षण | वय मर्यादा |
| प्रोबेशनरी ऑफिसर | 2056 | पदवीधर (PDF पहा) | 21 ते 30 वर्षे |
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन.
भर्ती प्रक्रिया :- मुलाखत/चाचणी.
अर्ज प्रारंभ :- 05 ऑक्टोबर 2021
एसबीआय पीओ २०२१ अर्जासोबत उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
एसबीआयने जाहीर केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भरती नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |














































































